डॉ. राजकुमार गवळे यांना पीजीडी एन वाय एस पदवी प्रदान
उदगीर (प्रतिनिधी) पाटोदा बुद्रुक येथील रहिवाशी डाॅ राजकुमार गवळे यांच्या जीवनाचा प्रवास आतीशय हालाकिच्या परिस्थितीतून झाला या परिस्थितीत त्यांनी चांगले व उच्च शिक्षण घेऊन त्यांनी सिध्द केले की शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.
डाॅ राजकुमार गवळे यांच्या
जीवनातील आनंददायी क्षण म्हणजेPGDNYS पदवी प्राप्त झाली असताना अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ढोरे यांच्या हस्ते पदवी देऊन सन्मान करण्यात आला. कमी वयात त्यांनी व्यसनाधीन जाणाऱ्या नव तरूनांना बाहेर काढण्याचा संकल्प उरी बाळगला व ते सत्यात उतरवले आज त्यांच्या कडे दोन आकडी व्यसनमुक्ती केंद्र आहेत ज्यामध्ये शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत हे सर्व सांभाळत त्यांनी शिक्षण चालू ठेवले व पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा नॅचरोपॅथी योगीक सायन्स ही पदवी प्राप्त केली आहे .पदवी प्राप्त करताच मित्र परिवारासह नातेवाईक व कर्मचारी यांनी आभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव केला आसून त्यांना आनेक जणांनी प्रत्यक्ष भेटून शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
चौकट:-
पदविका प्रदान करतेवेळी जीवनातील व फॅमिलीच्या सर्वांची उणीव जाणवली हे यश प्राप्त करण्यासाठी माझे सर्व कर्मचारी पदाधिकारी व माझ्यावर प्रेम करणारे सर्व माझे बांधव व भगिनी यांच्यामुळेच मला खरंच ही पदवी प्राप्त करता आली कारण माझं जीवन हे फार आर्थिक दृष्ट्या दुर्बल होते पण मी माझ्या कष्टाने व आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रेरणेने पैसे कमवून पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी झारखंड येथे कॅपिटल युनिव्हर्सिटी मध्ये डॉक्टर पदवी बी एन वाय एस व अमरावती येथे उच्च शिक्षित पदवी वैद्यकीय क्षेत्रामध्ये निसर्ग उपचार तज्ञ ही पदवी प्राप्त झाली व त्यावेळी येथील कुलगुरू यांनी माझ्या सन्मान करून अभिनंदन केले त्याबद्दल या यशाच्या पाठीमागे माझ्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माझे कुटुंब माझे कर्मचारी व नवजीवन आणि इतर शाखेतील सर्व क्लाइंट यांच्या आशीर्वादाने मी उच्चशिक्षित पदवी प्राप्त केली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार व असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे असे ते आमच्या प्रतीनिधीशी बोलतांना म्हणाले.
