शिवसेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक प्रेरणा दिन म्हणून साजरी
उदगीर (एल पी उगिले):
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उदगीर विधानसभातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तसेच हा दिवस सामाजिक प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, शहर संघटक प्रशांत ममदापूरे, लक्ष्मीकांत गुडमेवार, मारुती साळुंखे, बालाजी साळुंखे, श्याम तवर, ओम ददापुरे, गुणवंत वाडकर, बालाजी मिसळवाड, शंकर बेनकुंदे, राजू सोळुंके, इम्रान पठाण, वैभव गठडे, प्रणित चव्हाण, मुनाफ पठाण यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
या प्रसंगी वक्त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण, सर्वसमावेशक विकासाच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला.शिवसेनेतर्फे सामाजिक प्रेरणा दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला.
