शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
उदगीर (एल पी उगिले) येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात शिवसेनेच्या वतीने उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकी संदर्भात आढावा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते शरद कोळी, लातुर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटक सुनिता चाळक, संभाजीनगरचे विधानसभा संघटक वीरभद्र गादगे,लोहा तालुका प्रमुख भिमराव शिंदे यांची उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करून विरोधकांना च्यारीमुंड्या चीत करायचे आहे, यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी मीच उमेदवार आहे. अशा पद्धतीने काम करायच आहे, प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची असून जोमाने कामाला लागा. मराठवाड्यातील क्रांती पाहून विरोधक हादरले पाहिजेत,अशा पद्धतीने निवडणूक जिंकणे हे ध्येय ठेवून काम करा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करा, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, लातुर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केले.
यावेळी जिल्हा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, उप जिल्हाप्रमुख कैलास पाटील,श्रीमंत सोनाळे,तालुका प्रमुख प्रशांत मोरे ,शिक्षक सेनेचे अध्यक्ष सचिन साबणे, जळकोट तालुका प्रमुख विकास सोमवांशी, शहर प्रमुख बालाजी सोनाळे,नितीन धुळशेट्टे, तालुका समन्वयक व्यंकट साधने , मुद्देवार सावकार,शिवकांत चटनाळे , बनशीलाल कांबळे,उप तालुका प्रमुख महेश फुले, सचिन पटवारी, गोविंद बेंबडे, शरद सावरे, संजय मठपती, विनायक श्रीडोळे, मुन्ना पांचाळ, अरुन बिरादार,रोहित पाटील, तातेराव मुंडे, मिथुन वाडीकर,संदीप मोहटे, सारंग आगलावे, दत्ता जाधव,गंगाधर बाजगिरे,राजू पिटले, राहुल जाधव, वाल्मिक माचोळे, शेखर पांचाळ ,कैलास वाडीकर,रेणुका ताई,परशुराम इभुते, सोमेश्वर सोपा, .कृष्णा बाजगिरे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
