छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रबंधक बालजी पाटील होते. त्यांनी सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्हातील करवीर संस्थानामध्ये 28 वर्षे राज्यपदाची धुरा सांभाळली. याकाळात शिक्षण,आरोग्य, शेती, जलसिंचन, व वसतीगृहाची उभारणी सामाजिक सुधारणा ई.कार्य केले. त्याच बरोबर त्यांना आरक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. वेदोक्त प्रकरणामध्ये 1902 साली त्यांनी ब्राम्हाण पुरोहिताची हकालपट्टी करून मराठा समाजातील पुरोहित नेमले.मी क्षत्रिय आहे हे शाहू महाराजांनी नव्याने सिद्ध केले.ही त्यांची ऐतिहासिक कामगिरी होती असे मत यावेळी पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. डी. बी .मुळे यांनी मानले.या कार्यक्रमाला प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
