राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी – डॉ.श्री शरद तेलंगणे
उदगीर (प्रतिनिधी)
नुकतीच राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या उदगीर तालुका अध्यक्षपदी डॉ. शरद कुमार तेलगाने यांची निवड राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास येदुवंशी जी,यांच्या परवानगीने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अंकुश जाधव यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली.
संपुर्ण देशात व राज्यात राष्ट्रिय मोदी सेवा समिती जनकल्याणकारी अभियान अंतर्गत संबंध देशात व महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वामधील व राज्य सरकारच्या ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनामध्ये विविध जनकल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदरील संघटन जन जन पर्यंत म्हणजेच शेवटच्या घटकापर्यंत प्रचार, प्रसार अभियान राबवित असून सर्व शासकीय जनकल्याणकारी योजना राबविण्या बाबत राष्ट्रीय मोदी सेवा समितीचा प्रत्येक पदाधिकारी तत्पर आहे.केंद्र सरकारने ११ वर्षा मधील त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळामध्ये व त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मध्ये व राज्य सरकारमध्ये नरेंद्रजी मोदी व ना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जनकल्याणकारी अनेक योजना राबविल्या जातात. व आमलात पण आणल्या आहेत. पण कांहि अंशीं सर्व योजना शेवटच्या लाभधारक घटका पर्यंत पोंहचत नव्हत्या. सदरील काम राष्ट्रीय मोदी सेवा समिती मार्फत जन जन तक म्हणजेच शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम या संघटनेमार्फत अतिशय जलद गतीने चालू आहे. व
केले जाते.या योजना गोरगरीब , दिव्यांग,अनाथ, उपेक्षित,वंचित कागदपत्रांची पूर्तता करणे अभावी व निष्क्रिय अकार्यक्षम,टेबलाच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत रहाणार असल्याचे मत उदगीर तालुका पदी निवड झाल्यानंतर,सत्कारा प्रसंगी निवडीनंतर डॉ. शरदकुमार तेलगाने आपले मत व्यक्त करत होते. उदगीर तालुक्यातील सर्व वार्डामध्येच नव्हे तर सर्व बूथ न्याय व तालुका निहाय राष्ट्रीय मोदी सेवा समिती संपूर्ण भारत संघटन,सदस्यता संख्या वाढविणारा असून सर्व तालुक्यांमध्ये शाखा व तालुका कार्यकारणी करून, बुथप्रमुखांची नेमणूक करण्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे सत्कर्म करण्यासाठी राष्ट्रीय मोदी सेवा समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष विकास जी यदुवंशी, प्रदेश अध्यक्ष अंकुशजी जाधव, प्रदेश महामंत्री अनंतजी चौधरी, सचिनजी इंगोले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतजी धाकपाडे, देविदास मोहिते लातूर जिल्हा महामंत्री, लातूर जिल्हा युवा महामंत्री केशव जी जाधव,सौ चंद्रकला चव्हाण महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आदींनी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी डॉ. शरदकुमार तेलगाने यांचे उदगीर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
