हंडरगुळीकरांचा सन्मान ही गौरवाची बाब – रामचंद्र तिरुके
उदगीर(प्रतिनिधी)
साहित्यिक व व्यक्ती म्हणून प्रा . ज्ञानेश्वर हंडरगुळीकर हे उमदे व्यक्तीमत्व आहे. त्यांना मिळालेला सन्मान ही गौरवची बाब आहे, असे प्रतिपादन मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी केले .
उदगीर येथील साहित्यिक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांना ‘ डॉक्टर ऑफ लिटरेचर” या सन्मानाबद्यल उदगीर मसापाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी बोलताना तिरुके यांनी प्रा. हंडरगुळीकर यांच्या कार्याचा आढावा घेऊन संवेदनशील मनाचा हा कवी सन्मानासाठी योग्यच असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .
यावेळी मसापच्या उदगीर शाखेचे उपाध्यक्ष विवेक होळसंबरे ,प्रा.डॉ .म . ई तंगावार, ज्येष्ठ साहित्यिक धनंजय गुडसुरकर ,बालकुमार साहित्य प्रतिष्ठानच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष रामदास केदार , कार्यवाह रसूल पठाण, कोषाध्यक्ष लक्ष्मण बेंबडे ,शिवाजी बिरादार यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते .
