भाकसखेडा येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम!

0
भाकसखेडा येथे दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम!

उदगीर (प्रतिनिधी)
भाकसखेडा गावात बायफ संस्था आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने एक विशेष माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना पशुधन व्यवस्थापन, योग्य आहार, आरोग्य तपासणी व दुध उत्पादन वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि शाश्वत शेती व्यवस्थापनाची माहिती मिळाली. उपस्थित तज्ज्ञांनी गोपालन, पशुखाद्य नियोजन आणि आर्थिक साक्षरतेवरही प्रकाश टाकण्यात आला.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक आत्मविश्वास मिळाला असून, भविष्यात अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मतही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.यावेळी बायफचे डॉ. एकशिंगी संतोष, विभागीय वरिष्ठ प्रकल्प अधिकारी धाराशिव येथील डॉ. अतुल मुळे, विभागीय प्रकल्प समन्वयक,धाराशिव, नरेश कुलकर्णी, अपूर्वा शिंग, सुदर्शन गड्ठे, भाकसखेडचे उपसरपंच अरविंद मोरे, उदगीर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विवेक जाधव, लिंबाजी खेडकर, दयानंद मोरे, विष्णू कुमार पाटील, माजी सरपंच श्रीहरी जाधव, सुरेश जाधव, बालाजी तोबरे, माधव तोबरे, शिवकुमार टेकपुंजे यांच्यासह गावातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!