शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवणार – डॉ. शरदकुमार तेलगाने

0
शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवणार - डॉ. शरदकुमार तेलगाने

उदगीर (एल.पी. उगीले) केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक लोक कल्याणकारी योजना अजूनही लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. काही योजना खरोखरच समाजाच्या हिताच्या असून त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच शासनाने राबवलेले विविध लोककल्याणकारी उपक्रम देखील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उदगीर तालुक्यातील विशेष काम करण्याची योजना आखली जात असून “हर घर मोदी, घर घर मोदी”भूमिका घेऊन ज्या पद्धतीने मोदी सरकारने केलेली कामे लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. तर त्याच पद्धतीने राष्ट्रीय मोदी सेवा समिती आता सक्रिय होऊन कार्य करत आहे. त्याला गती देण्यासाठी आणखी एक स्वतंत्र फळी उभा करणे गरजेचे असून त्या दृष्टीने आपले विशेष प्रयत्न असणार आहेत. असे विचार राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ प डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले आहेत.
ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यांच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर, अमोल निडवदे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक करताना अमोल निडवदे यांनी स्पष्ट केले की, सामाजिक जाणीव जपणारा नेता राष्ट्रीय मोदी सेवा समितीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ही गोष्ट पक्षासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. डॉ. शरद तेलगाने यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच ते कीर्तनकार असल्याने भाविक भक्तही त्यांचे अनुयायी आहेत. त्याचाही फायदा निश्चितच पक्ष संघटन वाढीसाठी होणार आहे.
पुढे बोलताना डॉ. तेलगाने म्हणाले की, स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने समाजसेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ही भावना ठेवून “धर्मो रक्षति रक्षत:” या विचाराने प्रेरित होऊन धर्म आणि कर्म यांची सांगड घालून कार्यरत असलेले भाजप सरकार ज्या लोक कल्याणकारी योजना राबवत आहे, त्या योजनांची माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे. जेणेकरून विरोधकांच्या अफवा आणि अपप्रचाराला सर्वसामान्य माणूस बळी पडणार नाही. त्यादृष्टीने राष्ट्रीय मोदी सेवा समिती निश्चितच सक्रियपणे कार्य करेल. असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपण संघटन उभा करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!