सहा.पोलिस निरिक्षक संतोष केदासे यांचा सत्कार संपन्‍न

0
सहा.पोलिस निरिक्षक संतोष केदासे यांचा सत्कार संपन्‍न

सहा.पोलिस निरिक्षक संतोष केदासे यांचा सत्कार संपन्‍न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील पोलिस स्टेशन अहमदपूर येथे नव्यानेच रुजू झालेले सहा. पोलिस निरिक्षक संतोष केदासे यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस स्टेशन अहमदपूर येथे बदली होवून आलेले संतोष केदासे यांचा आज दि. 24 जुन 2025 रोजी सेवानिवृत्‍त प्रा. दिलीप भालेराव यांच्या निवासस्थानी सेवानिवृत्‍त पोलिस अधिकारी मनोहर पाटील व सेवानिवृत्‍त यशवंत ज्यु. कॉलेज येथील उपप्राचार्य प्रा. गिरीधर घोरबांड यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्‍त मुंबई पोलिस अधिकारी गोपिनाथ राजपंगे, प्रा. दिलीप गणपती भालेराव, प्रा. डॉ. गोपाळ माने, डॉ. बालाजी कारामुंगीकर, सामाजिक वनिकर अहमदपूर येथील वनपाल विठ्ठल देवकत्‍ते, लसाकम माजी तालुका अध्यक्ष नरसिंग सांगवीकर, आदर्श न्युज चॅनलचे संपादक तथा डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष उदयकुमार गुंडिले, पोलिस फलॅश न्युजचे गोविंद काळे, सहशिक्षक प्रशांत दुवे, अनिरुद्ध कारामुंगीकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्‍तर देताना सहा. पोलिस निरिक्षक संतोष केदासे म्हणाले की, आज आपल्यासमोर या सन्मानाचा स्वीकार करताना मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक जणांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आशीर्वाद लाभले आहेत. आजचा हा सत्कार केवळ माझा नाही तर माझ्या आई-वडिलांचा, माझ्या शिक्षकांचा, कुटुंबाचा आणि माझ्या सहकार्‍यांचाही आहे.सहा. पोलीस निरीक्षक म्हणून रुजू होताना माझ्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. जनता सुरक्षित राहावी, गुन्हेगारीला आळा बसावा, समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी या भूमिकेतून मी या ठिकाणी माझे कर्तव्य पार पाडणार आहे. आजच्या या सत्कार सोहळ्यात मला अनेक जुन्या आठवणीही आठवत आहेत. लहानपणी माझ्या आई-वडिलांनी मला चांगले संस्कार दिले. माझ्या शिक्षकांनी मला शिस्त आणि अभ्यासाची गोडी लावली. आज माझ्या यशाचे श्रेय या सर्वांच्याच कष्टांना जाते. त्याशिवाय माझ्या मित्रांनी नेहमीच मला सकारात्मक विचार दिले. या सत्कारासाठी आयोजक मंडळींचे आणि उपस्थित सर्वांचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. मला खात्री आहे की आपल्या प्रेमाने, विश्वासाने आणि पाठिंब्याने मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडीन. असेही ते शेवटी म्हणाले.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार नरसिंग सांगवीकर यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!