अंगावर कचरा का टाकला म्हणून महीलेसह तिघांना लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण ; दोघांविरूध्द गुन्हा दाखल
अंगावर कचरा का टाकला म्हणून महीलेसह तिघांना लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण ; दोघांविरूध्द गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हाडोळती येथे एका महीलेने घरा समोरील अंगनातील कचरा झाडून तो घरा समोरील रोडवर टाकत असताना तो एका व्यक्तीच्या अंगावर पडला असता तो कचरा माझ्या वडीलांच्या अंगावर का टाकला म्हणून मुलाने चार जणांना लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली असुन दोन जणांवर दि २६ जुन रोजी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील महीला सुमनबाई गुरुनाथ राजुरे ह्या दि २६ जुन रोजी सकाळी ०९ .०० वाजता आपल्या स्वताच्या घरासमोरील अंगणातील कचरा झाडून तो गोळा झालेला कचरा घरासमोरील रोडवर टाकत असताना तो कचरा गावातीलच जावेद करीमसाब शेख यांच्या अंगावर पडला असता सदरील महीलेने चुकून पडला म्हणुन माफी सुध्दा मागीतली परंतु तेवढ्यात तेथे जावेद शेख यांचा मुलगा आयान जावेद शेख आला व घडलेला प्रकार बघुन महीलेला
सुमनबाई गुरुनाथ राजुरे व तिचा मुलगा नामदेव गुरुनाथ राजुरे पती गुरुनाथ बापुराव राजुरे व मुलाचा मावस भाऊ सुनिल धोंडीबा हिवरे यांना साल्यानो माझे नादी लागता का तुम्हा एक एकाला खलास करुन टाकतो तुमच्या आया बहीनीची वाट लावुन टाकतो असे म्हणुन लोखंडी रॉडने व बेल्टने बेदम डोक्यात ,हातावर, मांडीवर,डोळ्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली असुन नामदेव गुरुनाथ राजुरे वय- 41 वर्ष व्यवसाय-शेती रा. हाडोळती ता अहमदपुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावेद करीमसाब शेख ,आयान जावेद शेख यांच्यावर दि २६ जुन रोजी अहमदपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ कलम ११८(२),११५(२), ३५२,३५१(२),३५१(३), ३( ५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
