वाळू माफी यांची वाढतेय दादागिरी !!प्रशासनाची काय आहे कमजोरी की लाचारी ?

0
वाळू माफी यांची वाढतेय दादागिरी !!प्रशासनाची काय आहे कमजोरी की लाचारी ?

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर, अहमदपूर, जळकोट, रेणापूर, लातूर या भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन आणि वाहतूक विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. विशेष बाब म्हणजे हे अवैध वाळूचे धंदे करणारे वाळू माफिया प्रचंड मग्रुर आणि दादागिरी करत सुटले आहेत. यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? अवैध वाळू वाहतुकीतून शासनाचा लाखो रुपयांचा रॉयल्टी कर बुडवला जातो आहे, आणि हे वाळू माफिया वाले कोट्यावधी रुपये कमवल्यामुळे त्यांची दादागिरी सतत वाढत चाललेली आहे. काही भागात चिरीमिरीच्या नादात पोलिस नजर अंदाज करत असले तरी काही प्रामाणिक पोलीस अधिकारी आपले काम करत आहेत. अशा मग्रूर बनलेल्या वाळू माफियावर गुन्हेही दाखल करत आहेत. मात्र कधी कधी प्रशासनातील काही अधिकारी वाळू माफियाला पाठीशी घालतात की काय? अशी शंका येण्याइतपत पाठराखन करत असल्याचे काही दाखले समोर येऊ लागले आहेत. झारीतले शुक्राचार्य बनलेले काही दलाल आणि अधिकारी, कर्मचारी किरकोळ स्वार्थासाठी आपले कर्तव्य विसरून आणि शासनाची रॉयल्टी बुडवण्याला तयार होऊ लागले आहेत. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
उदगीर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातील मुसा नगर जवळ अशाच पद्धतीने वाळू वाहतूक करणारे आणि त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना पोलिसांनी या वाळू घेऊन जाणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्याकडे रॉयल्टी व पास परवाना विचारणा केला असता, ते दाखवायला तयार नसल्याने तसेच पोलीस आल्यानंतर रेतीचा टिप्पर कारवाईसाठी घेऊन जात असताना टिप्पर समोर येऊन उभे राहून पोलिसांच्या विरोधामध्येच आवाज वाढवून टिप्पर समोर थांबून, गाडी कशी घेऊन जातोस? अशा पद्धतीची उर्मट आणि मगरूर भाषा वापरून विरोध केल्याप्रकरणी फिर्यादी भास्कर बाबुराव सूर्यकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुमेर कलीम तांबोळी (राहणार मुसा नगर उदगीर) समीर कलीम तांबोळी (राहणार मुसा नगर उदगीर) असद पठाण आणि सिकंदर अजगर शेखरा (राहणार मुसा नगर उदगीर) या चौघांच्या विरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 208 /25 कलम 126 (2), 132 (3) (5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर शहरातील अवैध वाळू व्यवसाय करणारे तसेच त्या व्यवसायाला पाठिंबा देऊन आपले भले करून घेणारे माफियावाले यांचे लागेबांधे असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे.
सर्व वाळू विक्रेत्याकडून हे दलाल पैसे उकळून प्रशासनातील काही लाचखोर प्रवृत्तीला सांभाळत असल्याची ही चर्चा आहे.

चौकट…..
प्रसिद्धी माध्यमांचा दणका

दैनिक बालाघाट चा आवाज सह इतरही वृत्तपत्रातून यासंदर्भात आवाज उठवण्यात आला होता. या वाळू माफिया च्या संदर्भामध्ये येणाऱ्या अंकात आम्ही सविस्तर लिखाण करणार आहोत असे जाहीर करतात अहमदपूर येथील वाळू माफिया वर आयपीएस अधिकारी पोलीस उपाधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांनी मोठी कारवाई करून जवळपास एक कोटी 46 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस फ्लॅश न्यूज वृत्तपत्राने या वाळू माफी यांची दादागिरी आणि माजोरीपणा यासंदर्भात यापूर्वीही लिखाण केलेले आहे.

चौकट…..
अहमदपूर येथे वाळू माफीयांना दणका……

गंगाखेड येथील गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करून अहमदपूर तालुक्यातील नांदेड रोडच्या सीमेवर असलेल्या रावळा शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठा साठा करून ठेवला होता त्या ठिकाणावरून चोरट्या पद्धतीने टिप्पर द्वारे मनमानी भावामध्ये विक्री केली जात होती या अनुषंगाने आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकून चार हायवा टिप्पर दोन जेसीबी एक बोलेरो आणि वीस ब्रास वाळू सह एक कोटी 46 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस सूत्राकडून हत्या केली माहिती अशी की अहमदपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून अवैध मार्गाने गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातून उपसा केलेली वाळू लातूर नांदेडच्या सीमावरती भागात रावळा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात साठा करून तो रात्रीच्या वेळी टिप्परच्या साह्याने चोरट्या पद्धतीने अहमदपूर उदगीर देवणी जळकोट चाकूर या परिसरामध्ये विक्री केली जात होती ही माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर उपयोगी पोलीस अधिकारी तथा आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांनी आपल्या सहकारी सह धाड टाकली. यावेळी पोलीस कर्मचारी आकनगिरे, लक्ष्मण आरदवाड, दीपक सोनकांबळे, रायभोळे तसेच अहमदपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनर, दिंडगे, मारुती शिंदे, राजगीरवाड इत्यादीच्या पथकाने रावळा शिवारातील सखाराम नामदेव राठोड यांच्या गट क्रमांक 151 या शेतात अचानक छापा टाकून एक कोटी 46 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आकनगीरे यांच्या फिर्यादीवरून ओंकार सुग्रीव दाभाडे, संगमेश्वर निवृत्ती नरवटे, संतोष सतीश शेळके, सखाराम नामदेव राठोड, शेख फत्तुसाब इस्माईल, भैय्यासाहेब बळीराम कांबळे, संतोष कुलाल, सोमनाथ माळी, दस्तगीर पठाण, संगम राजकुमार कदम यांच्या विरुद्ध गुरन 446 /25 कलम 303 (2), 3 (5) बी एन एस सहकलम पर्यावरण अधिनियम कलम 15 प्रमाणे अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट……
वाळूच्या ढिगार्‍यामुळे कार व क्रुझर जीप चा अपघात….

उदगीर शहरातील जळकोटे फंक्शन हॉल जवळ एक कार आणि क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कारचालक किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघात हा रस्त्याच्या कडेला टाकलेल्या वाळूच्या ढीगार्‍यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. वाळू माफिया बिनधास्तपणे रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला मोठमोठे रेतीचे ढीग लावून ठेवत आहेत. त्यामुळे लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. या संदर्भात अनेक वेळा ओरड होऊन देखील वाळू माफीयावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. याबद्दल नागरिकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.

चौकट….
अनेक वाळू हायवा बीना नंबरच्या…….

पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाला चकली देण्यासाठी, हप्ता वाचवण्यासाठी काही हायवा चालकांनी शक्कल लढवली आहे, काही गाड्या एक सारख्या नंबरच्या तर काही गाड्या बिना नंबरच्या, काही गाड्यांच्या नंबर वर डांबर फासलेले अशा पद्धतीच्या युक्त्या वापरून वाळू माफिया बिनधास्तपणे अवैध वाळू उपसा करत आहेत. या संदर्भात ओरड होऊन ही कारवाई होत नसल्याची आणि कधी पोलिसांनी कारवाई केली तर लगेच ती गाडी सोडून देण्यासाठी महसूल प्रशासन तत्पर असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

चौकट……

ते दलाल कोण ?

वाळू माफीयांची पाठराखन करत त्यांना संरक्षण देणारे झारीतील शुक्राचार्य बनलेले कर्मचारी आणि दलाल यांची सांगड जमल्याने मोठ्या प्रमाणात वसुली करून अधिकारी, कर्मचारी आणि इतर संबंधितांना आम्ही सांभाळतो, असे म्हणून राजरोसपणे हप्ता घेतला जात असल्याचे किरकोळ वाळू विक्रेते सांगत आहेत.
.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!