सत्कार कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर

0
सत्कार कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते - पृथ्वीराज पाटील एकंबेकर

उदगीर /प्रतिनिधी

अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेत, माहिती व तंत्रज्ञानाचा मोठा प्रमाणात उपयोग होत असून, बदलत्या काळात जीवनात यशस्वी करावयाचे असेल तर शालेय जीवनात आपल्यामध्ये कोणती क्षमता आहे, याचा शोध घेतला पाहिजे.असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील एकंबेकर यांनी केले. ते विद्यावर्धिनी हायस्कूल मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्या सत्कार विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर ,सचिव पी.टी शिंदे, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील,सदस्य पुंडलिकराव पाटील, पृथ्वीराज पाटील एकंबेकर सचिव महाराष्ट्र एकीकरण समिती, मुख्याध्यापक राम ढगे, उप मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, पर्यवेक्षक संदीप बांगे,पर्यवेक्षक राजेंद्र वलाकटे, मुख्याध्यापक दिलीप हणमंते यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थित होती. याप्रसंगी पृथ्वीराज पाटील असे म्हणाले की,सत्कार कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत असते. त्यामुळे दरवर्षी भव्य दिव्य कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात येतो. याप्रसंगी दहावी बोर्ड परीक्षेत 90 टक्के च्या वर विद्यार्थ्यांनी यश मिळवलेल्या धनश्री मोरे,शिवप्रसाद बिराजदार, ओम पाटील, विशाखा उजगरे,नंदिनी पोलकर, मयंक हवा, समीर शेख, गणेश सातानुरे,सदाशिव ढगे,मनस्वी कलमे, श्रेया बिरादार, गायत्री मुर्केवार, खुशी इनानी, दर्शन चिंचोलकर,यशवंत बेळकुंदे, ऐश्वर्या भारती ,अथर्व फुले, आरूशी घोगरे,अक्षरा यणगे, भूमि जानतीने, सुयश वाघमारे, संजना बारहते, ओम शिंदे, श्रीकांत पाटील, पियुष नुत्ते, वैष्णवी चोले ,पृथ्वीराज बाबू, शिवम होनराव, प्रणिता भुरे, गुलनाज शेख,अनुष्का कुमठे, भक्ती काळवणे ,प्रांजली सुरवसे, प्रथमेश पोद्दार ,श्रेया सोळुंके, पूजा लोभाजी, मयूर शिंदे, ओमराजे राजूरकर ,वैष्णवी पाटील इ. अनेक विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मानचिन्ह पुष्प देऊन सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के जाधव यांनी केले तर आभार बी.बी नागरवाड यांनी मांनले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील,बंडू पाटील लोणीकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!