कायदा सुव्यवस्थेचा मजबूत करत पगडा !!हातभट्टीला हद्दपार करण्यासाठी बंदोबस्त केला तगडा !!

0
कायदा सुव्यवस्थेचा मजबूत करत पगडा !!हातभट्टीला हद्दपार करण्यासाठी बंदोबस्त केला तगडा !!

वाढवणा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई !!

उदगीर (ॲड.एल.पी.उगिले) वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये प्रभारी अधिकारी म्हणून सुनील गायकवाड रुजू झाल्यापासून, अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परवाच एक अवैध दारूच्या संदर्भातील खूप मोठी धाड टाकून हातभट्टीचे रसायन नष्ट करून संबंधितांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्या गुन्ह्याची शाई वाळते न वाळते तोच, पुन्हा एक भली मोठी धाड टाकून अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारू विक्रेत्यावर चांगलीच वचक निर्माण केली आहे.
वाढवणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळत, अवैध पद्धतीने हातभट्टी चालवणाऱ्या लोकांची माहिती घेऊन, आपल्या सोबत पोलीस हवालदार संजय दळवे पाटील, शिवप्रताप रंगवाळ, तुकाराम बळदे यांच्यासह काही निवडक कर्मचाऱ्यांचे पथक बनवून, अचानकपणे डोंगरशेळकी तांडा येथे शांतप्पा विश्वनाथ मठपती यांच्या शेतालगत असलेल्या विहिरीजवळील ओढ्यात उत्तम भगवान राठोड हा हातभट्टी लावून गावठी हातभट्टीची दारू बनवत असल्याची गुप्त माहिती मिळताच, धाड टाकली. त्या ठिकाणी दोन निळ्या रंगाचे प्रत्येकी अंदाजे 200 लिटरची क्षमता असलेले प्लॅस्टिकचे ड्रम व दोन लोखंडी ड्रम ज्यांची क्षमता दोनशे लिटर आहे. तसेच चार निळ्या रंगाचे शंभर लिटर क्षमतेचे ड्रम ज्यामध्ये आंबट व उग्र वास येत असलेली गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरात येणारे गुळ मिश्रित फसफसते रसायन एकूण बाराशे लिटर ज्याचा बाजार भाव साधारणतः प्रति लिटर 70 रुपये प्रमाणे एकूण 84 हजार रुपयाची गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगलेले व पोलिसांची चाहूल लागताच धूम ठोकलेले, आरोपी यांचा माग काढत पोलीस प्रशासनाने हाती लागलेले रसायन नष्ट केले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात धाड पडल्यामुळे अवैध हातभट्टी बनवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अवैध दारू विक्री आणि हातभट्टी यासंदर्भात सजग राहण्याच्या सूचना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप तसेच लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेले असल्यामुळे प्रभारी अधिकारी सपोनि सुनील गायकवाड यांनी आपल्या कर्तबगार सहकाऱ्यांना सोबत घेऊन मोठी कारवाई केल्याबद्दल या परिसरातून कौतुक केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पाण्याच्या जार मधून हातभट्टीची दारू विक्री करणारे आरोपी आणि हातभट्टीची दारू वाढवणा पोलिसांनी पकडून नष्ट केली होती.
पोलिसांना फसवण्यासाठी पाण्याचे जार आणि पाण्याच्या बाटल्यांचा वापर हे अवैध दारू विक्रेते करत होते. आज पर्यंत साधारणतः हा व्यवहार होत असताना लोकांना पाण्याचे जार जात आहेत, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात त्या जार मधून हातभट्टीची दारू वाहतूक केली जात असल्याचे आणि त्याच्याच माध्यमातून विक्री केली जात असल्याचे सपोनि सुनील गायकवाड यांनी हेरले होते. यासंदर्भात त्यांनी गोपनीय बातमीदार नेमून माहिती ही काढली होती, आणि ती माहिती हाती येताच धाड टाकली होती.
त्याच पद्धतीने माहिती काढून डोंगरशेळकी तांड्याच्या शिवारातील ओढ्यात हातभट्टी लावलेली शोधून काढून 84 हजार रुपयांची हातभट्टीची दारू आणि रसायन नष्ट केली आहेत. या परिसरातून कोणत्याही परिस्थिती मध्ये हातभट्टीची दारू बनवली जाणार नाही, किंवा आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री होणार नाही. यासाठी वाढवणा पोलीस सज्ज असल्याची माहिती सुनील गायकवाड यांनी दिली आहे.
एवढी मोठी धाड झाल्यानंतर पोलीस हवालदार संजय दळवे पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम भगवान राठोड याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव सारोळे यांनी दाखल केला आहे. सदरील प्रकरणी गुरन 188 /25 कलम 65 (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. कलकत्ते हे करत आहेत.

चौकट…..

वाढवण्याला आलाय गुन्हेगारांचा कर्दनकाळ !

वाढवणा पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी धडाकेबाज मोहीम चालू करून गुन्हेगारांना पळता भुई थोडी केली आहे. एका बाजूला धाडसत्र तर दुसऱ्या बाजूला शोध सत्र अशी दुहेरी मोहीम राबवून त्यांनी अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रमाणिक प्रयत्न केल्यामुळे, हा अधिकारी म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळच ठरेल! अशी वाच्यता परिसरातील नागरिक करू लागले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!