युवक काँग्रेसच्या बैठकीत युवकांना मार्गदर्शन व संविधान विचारांचे बळ

0
युवक काँग्रेसच्या बैठकीत युवकांना मार्गदर्शन व संविधान विचारांचे बळ

उदगीर (प्रतिनिधी) – युवकांमध्ये राजकीय जागृती, संघटन क्षमता आणि संविधान व काँग्रेस विचारसरणीचे भान निर्माण करण्याच्या उद्देशाने युवक काँग्रेस उदगीर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तालुका कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृह, उदगीर येथे उत्साही वातावरणात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थान जय जवान अभियान महाराष्ट्र चे प्रमुख संदीप डव्हळे पाटील हे होते. प्रारंभी जय जवान अभियान महाराष्ट्र चे प्रमुख संदीप डव्हळे पाटील यांनी युवकांसमोर संविधानाचे महत्व, एकता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे मूल्य यावर सखोल भाष्य केले. त्यांनी काँग्रेसचा समृद्ध इतिहास, त्याग, बलिदान, आणि राहुल गांधी यांचे सत्य,अहिंसा व लोकशाहीसाठीचे संघर्ष यावर दिलखुलास विचार मांडले. “राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून मूल्यांसाठीचा संघर्ष आहे,” असे ते म्हणाले.
यानंतर उदगीर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील यांनी यशवंतराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण करून दिली. युवकांनी निर्व्यसनी राहून समाजसेवा करावी असे सांगताना, “तरुणांनी स्वच्छ मनाने आणि नशामुक्त राहूनच समाजाला योग्य दिशा देता येते,” असे स्पष्ट केले.उदगीर शहर काँग्रेस अध्यक्ष मंजूर पठाण यांनी सध्या देशभरात ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या मोहिमेवर प्रकाश टाकत, “मतदान यंत्रणेत पारदर्शकता नसल्यास लोकशाही धोक्यात येते,” असा इशारा दिला. त्यांनी युवकांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
माजी नगरसेवक मेहबूब शेख यांनी काँग्रेस पक्षाचे खरे बळ सामान्य कार्यकर्ते असल्याचे नमूद करत, “कार्यकर्त्यांना सन्मान, संधी आणि नेतृत्व मिळाले पाहिजे, तेव्हा संघटन खऱ्या अर्थाने सक्षम होते,” असे ठामपणे सांगितले.
या बैठकीत विवेक पंडितराव जाधव यांनी आपल्या भाषणात राहुल गांधींच्या संघर्षशीलतेचे समर्थन करत, “राहुल गांधी हे आजच्या तरुणांचे प्रामाणिक नेतृत्व आहेत,” असे सांगितले. त्यांनी उपस्थित तरुणांना आश्वस्त करत, “मी सदैव तुमच्या पाठीशी असून, तुमच्या अडचणींसाठी पूर्णवेळ उपलब्ध आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीला जि.प. चे माजी सभापती मधुकरराव एकूरकेकर, संतोष बिरादार, गौतम पिंपरे, श्रीकांत पाटील, संजय काळे, प्रदेश सचिव श्रीनिवास एकूरकेकर, शहराध्यक्ष आदर्श उर्फ सोनू पिंपरे, जिल्हा सरचिटणीस फैय्याज डांगे, तालुका सरचिटणीस सद्दाम बागवान, कनिष्क शिंदे, पद्मसिंग करखेलीकर, सोशल मिडिया अध्यक्ष पवन सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष प्रवीण पटवारी, ओबीसी शहराध्यक्ष मंगेश येरकुंडे, तसेच कृष्णा फड, गणेश कारभारी, बालाजी गायकवाड, आदित्य बिरादार, कृष्णा कोनाळे, अरबाज मुंजेवार, महादेव दाजी, बापूराव मुंडे, कृष्णकांत लाळे, सचिन सोनकांबळे, दयानंद आडे, दत्ता सगर, राहुल पाटील यांच्यासह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या अखेरीस संघटन बळकट करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजनबद्ध कार्यक्रम, युवक मेळावे आणि संविधान जागर मोहिमा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक गावात युवकांचे वृत तयार करून ‘बुथ ते ब्लॉक’ पातळीवर कार्यशक्ती मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!