राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
उदगीर (प्रतिनिधी):- राज ठाकरे यांचा नुकताच वाढदिवस झाला यानिमित्ताने दरवर्षी महाराष्ट्रभर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात. याच अनुषंगाने उदगीर मनसेने ही 14 जून ते 30 जून दरम्यान विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यात रक्तदान शिबिर,गाव तेथे शाखा,1000 वर्ष लागवड,शालेय साहित्य वाटप,सर्व रोग निदान शिबिर असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उदगीर विधानसभेत तालुक्याच्या ठिकाणी तसेच गावोगावी शाखेच्या ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आले. याचाच एक भाग म्हणून दिनांक 29 जून रोजी उदगीर येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात उदगीर तालुक्यातील व शहरातील महाराष्ट्र सैनिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. याचे महत्व जाणून घेत, राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 रक्तदात्यानी रक्तदान केले. या शिबिरास उदगीर शिवसेना तालुकाप्रमुख प्रशात मोरे सह शिवसैनिकांनी भेट देत रक्तदान करुन सहभाग नोंदविला.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुकाध्यक्ष महेश देशमुख, शहराध्यक्ष संतोष भोपळे, संग्राम केंद्रे, सुनील तोंडचिरकर, लखन पुरी, अविनाश ठाकुर,केदार पुराणिक, गजेंद्र जाधव, भानुदास राठोड,अमोल गाजरे , राम कांबळे, रोहित बोईनवाड,अजय जाधव,दिपक करक्याळे,गजानन तळभोगे, रणजित मालुसरे, बालाजी धोत्रे ,सोमेश्वर कांबळे, विनोद चव्हाण, महेश लोहकरे,भुषन बनाटे , श्रीनिवास पाटील,विलास मोहटे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
