रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांचा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश

0
रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांचा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश

पुणे (शंकर जोग)
रिपब्लिकन चर्मकार महासंघ ही संघटना संजू भाऊ बनसोड यांनी स्थापन करून या संघटनेच्या माध्यमातून दलित, वंचित, उपेक्षित, गोरगरीब नागरिकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलन केली आहेत. इतकेच नाही तर वेळप्रसंगी, मोर्चा ही काढलेला आहे. ही संघटना अजून मजबूत होण्यासाठी मुंबई येथे मुक्ताई बंगल्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत असताना, या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हाती धनुष्यबाण घेऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आगामी काळामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड हे संभाव्य उमेदवार राहणार असल्याची चर्चा आहे, यावेळी संघटनेचे खजिनदार सुनील राठी, महाराष्ट्र प्रदेश मुख्य सचिव सुनील गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय शेवकर, मुंबई प्रदेश सचिव बळीराम कांबळे, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष विजय शिंगणे, मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष गंगोत्री साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष गटई कामगार सुनील चराटे, उमेश सराटे, संजय ब्राह्मणे, अजय जोरे, बंडू पुरुषोत्तम, रवींद्र शिराळे, मनीषा कांबळे, यांच्यासहित मोठ्या संख्येमध्ये चर्मकार बांधव, माता भगिनी उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!