सामाजिक उपक्रमाने शिवसेनेच्या वतीने ना. आबिटकर यांचा वाढदिवस साजरा
उदगीर (एल पी उगिले)
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा लातूर जिल्हा संपर्क मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल व उदगीर तालुका शिवसेना आणि उदगिरी लॉयन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नेत्र निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप,रुग्णांना फळे वाटप करण्यात आले,
शिबिराचा १३१ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली तर यापैकी ३५ नेत्र रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न झाल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,डॉ. सुदाम बिरादार, डॉ. शीतल पेददेवाड,रवी जवळे, समनवयक प्रशांत गायकवाड, टेक्निशियन महेश समगे,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख,लक्ष्मीकांत गुडमेवार सदस्य उदयगिरी लॉयन्स रुग्णालय,मारोती सोळुंखे,प्रदिप पाटील,बालाजी सोळुंखे,संगम मेहत्रे, गुणवंत वाडकर,महेश बोयने,बालाजी वरदाळे,कृष्णा चव्हाण,गौतम कांबळे, राजू सोळुंखे,राजू गटकर आदी शिवसैनिक,रुग्णाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन समाजसेवक तथा उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोंटीया यांच्या हस्ते तर सपोनी भीमराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
