तोंडचीर जिल्हा परिषद शाळेत ‘हॅप्पी स्कूल’चे उदघाटन

0
तोंडचीर जिल्हा परिषद शाळेत 'हॅप्पी स्कूल'चे उदघाटन

उदगीर (एल पी उगिले) : येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने तोंडचिर येथील पीएमश्री जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत हॅप्पी स्कूलची सुरुवात करण्यात आली असून हॅप्पी स्कूल अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सोयी सुविधाचे उदघाटन नायब तहसीलदार राजश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल कलबुर्गी येथील १९८८-८९ या वर्षीच्या विद्यार्थ्यांच्या सहयोगातून या हॅप्पी स्कूलची सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळणी, शाळेची रंगरंगोटी, स्वछतागृह, हॅन्डवॉशची सोय, कपाट व पुस्तके, जल शुद्धीकरणाची सोय, संगणक आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुदर्शन पाटील होते. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रविंद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन विशाल तोंडचिरकर, महानंदा सोनटक्के, प्रा. मंगला विश्वनाथे, प्रशांत मांगुळकर, प्रा. अन्नपूर्णा मुस्तादर, विद्या पांढरे, विक्रम हलकीकर, गणेश तोलसरवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक घुमाडे यांनी केले. सुत्रसंचालन कमल पाचंगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक विठ्ठलराव चामे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!