अविनाश जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी-योग प्रबोधन तथा शालेय साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
अविनाश जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी-योग प्रबोधन तथा शालेय साहित्य वितरण व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) :- बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपूर चे सहसचिव अविनाश जाधव यांच्या वाढदिवस निमित्ताने धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगीरच्या वतीने संस्थे अंतर्गत येणाऱ्या शाळा-महाविद्यालयांच्या सहकार्याने विविध ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर,योग प्रबोधन तथा शालेय साहित्य वितरण व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले.
स्वामी विवेकानंद विद्यालय,शिरूर ताजबंद येथे 337; मोहनराव पाटील डी.एड.कॉलेज व वसंतराव नाईक बी.एड.कॉलेज,शिरूर ताजबंद येथे 58; यशवंत प्राथमिक-माध्यमिक विद्यालय,वाढोणा येथे 248 तर राष्ट्रीय माध्यमिक-प्राथमिक विद्यालय,उदगीर येथे 104 आणि तसेच संत तुकाराम विधी महाविद्यालय व राजीव गांधी जि.एन.एम.स्कूल ऑफ नर्सिंग,उदगीर येथे 95 याप्रमाणे एकूण 842 विद्यार्थी-विद्यार्थिनीं तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तथा डॉक्टरांनी स्वास्थ्य-प्रकृती किंवा विविध रोगानुसार दिनचर्या व ऋतुचर्या विषयक प्रबोधन तथा योग विषयक माहिती देण्यासोबतच पौगंड अवस्थेतील शारीरिक व मानसिक बदलविषयक समुपदेशन-मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील,प्राचार्य नीळकंठ पाटील,प्राचार्य ऍड. राजकुमार नावंदर,प्राचार्य यादव कर्डीले,मुख्याध्यापक दीपक भराटे, मुख्याध्यापक व्ही.बी. बिरादार, मुख्याध्यापक उमाकांत स्वामी मुख्याध्यापक राजकुमार कानवटे, मुख्याध्यापिका सुनीता फड,प्रा.उत्तम चामे यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली सदरील उपक्रम संबंधित विविध शाळा किंवा महाविद्यालयात संपन्न झाले.
विविध ठिकाणी एकाच दिवशी व एकाच वेळी आयोजित सदरील आरोग्यविषयक उपक्रमात डॉ.सायराम श्रीगिरे,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे, डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दीपिका भद्रे,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.किरण मुळगीर यांनी वैद्यकीय सेवा दिली.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक प्रा.अतुल जाधव,माधव पाटील,एन.एम.जहागीरदार,भीम बिरादार,नीलकंठ भोसले,सुकुमारी बिरादार,एम.आर.माने,बालाजी कांबळे,व्यंकट आवलकोन्डे,आदी शिक्षक वृंदांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाच्या शिक्षकवृंदासह विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!