खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी

0
खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी

माणगाव ( विश्वास गायकवाड )

खोपोली पोलीस ठाणे हद्यीतील गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 8,96,000/- रुपये किमतीचे एकुण 48 ॲन्ड्रॉईड मोबाईल सी.ई.आय.आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे.
खोपोली पोलीस स्टेशनच्या कार्य क्षेत्रातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या, चोरीस गेलेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी सी.ई.आय.आर. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन जवळपास 48 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन त्याची एकुण किंमत 8,96,000/- रुपये इतकी आहे. सदरचे मिळुन आलेले एन्ड्रॉईड मोबाईल हे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई.आय.आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले असुन आजपावेतो एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. ते सर्व मोबाईल मालकांना अर्थात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार करणाऱ्यांना परत देण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल,अपर पोलीस अधीक्षक, अभिजीत शिवथरे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक शितल राउत, अमोल राठोड यांनी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!