आधुनिक भारताचे कृषीसंत वसंतराव नाईक – प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे

0
आधुनिक भारताचे कृषीसंत वसंतराव नाईक - प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे

उद‌गीर (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे होते.त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. वसंतराव नाईक यांच्या कार्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ते भारत मातेचे थोर सुपुत्र होते.त्यांनी महाराष्ट्राचे 11 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. रोजगार हमी योजनेचे जनक,श्वेतक्रांती, कृषीक्रांती या क्षेत्रात त्यांनी खूप मोठे योगदान दिले.त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा राजा आणि शेतकरी यो‌द्धा समज‌ले जाते. राजकार‌णात काम करून समाज सेवकाची भूमिका त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडली असे मत या प्रसंगी डॉ. मांजरे यांनी काढले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंयोजक डॉ.डी.बी.मुळे यांनी मानले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संपन्न झाला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!