शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
उदगीर (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उदगीर तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला. उदगीर शहरातील शाखाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख यांची यादी जाहीर झाल्यानंतर त्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, शिवसेना शहर प्रमुख बालाजी सोनाळे, माजी शहर प्रमुख शिवकांत चटनाळे, अरुण बिरादार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला.
नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन बांधणीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत, येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने कार्य करून जलसंपर्क वाढवावा. असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
