तोंडचिर ग्रामपंचायतचा वृक्षारोपणाचा आदर्श संकल्प

0
तोंडचिर ग्रामपंचायतचा वृक्षारोपणाचा आदर्श संकल्प

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथील ग्रामपंचायतीने आपल्या गावातील लोकसंख्येच्या दुप्पट वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला आहे. या संकल्पची सुरुवात एक जुलै रोजी उदगीरचे आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली. तोंडचिर गावापासून शेल्हाळ गावाच्या सीमेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीने घेतलेला संकल्प निश्चितच कौतुकास्पद असून इतर ग्रामपंचायतीने देखील असा आदर्श घ्यावा, असाच आहे. वृक्षारोपण करतेवेळी तंटामुक्ती अध्यक्ष सुदर्शन पाटील, बब्रुवान पाटील, माधव येचावाड, माधव सुतार, आकाश स्वामी, विजय भद्रे, महेश चिल्लरगे, खंडू जाधव, धोंडीबा कांबळे, दशरथ जाधव, विनायक ताटवाडे, रोशन जाधव, अनिल कांबळे, रोहित कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!