ह भ प डॉक्टर शरद तेलगाणे यांचा सत्कार संपन्न

0
ह भ प डॉक्टर शरद तेलगाणे यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होम चे प्रमुख डॉ. शरद कुमार तेलगाने यांची निवड राष्ट्रीय मोदी सेवा समिती च्या वतीने उदगीर तालुका प्रमुख म्हणून केली आहे. सामाजिक जाणीव जपणाऱ्या तसेच अध्यात्मिक क्षेत्राचे अधिष्ठान असलेल्या प्रबोधनात्मक कीर्तनकार डॉ. शरदकुमार तेलगाने यांची ही निवड अतिशय योग्य आहे. म्हणून उदगीर येथील जागृत देवस्थान रोकडे हनुमान भजनी मंडळाच्या वतीने, त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुनील लदाडे, गुरुलिंग स्वामी, व्यंकटेश पेन्सलवार, हनुमंतराव शेळके यांच्यासह भजनी मंडळाच्या सदस्य असलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ. शरदकुमार तेलगाने म्हणाले की, पक्षी श्रेष्ठींनीही फार मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. माझ्यातली कार्यक्षमता त्यांना पटलेली आहे. त्यांचा तो विश्वास मी टिकउन ठेवेन. संपूर्ण उदगीर तालुक्यामध्ये शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती त्या त्या योजनेच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांची नवीन फळी उभा करून पक्ष संघटन बांधणीला बळ देईन, तसेच राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे काम लोकांच्या हितासाठी आहे. हे देखील लोकांना समजावून सांगेन, त्यामुळे लोक सहभाग मोठ्या संख्येने मिळू शकेल. असा मला पूर्ण विश्वास आहे. कीर्तनकार असल्यामुळे आपण माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला, माझा सत्कार करून मला दुप्पट जोमाने कार्य करण्याची ऊर्जा दिली. त्याबद्दल मी कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो. जे जे चांगले असेल, समाज हिताचे असेल, ते ते करण्याचा माझा नेहमीच अट्टाहास राहणार आहे, असे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हणमंतराव शेळके यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!