महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : कृषिदिनानिमित्त महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, कोषाध्यक्ष माननीय महादेव नौबदे, प्रा. डॉ. राम साबदे, प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी अधिकारी व छात्रसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पर्यावरणसंवर्धन आणि कृषीप्रेम जागवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बोलताना अध्यक्षांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!