अंधाराचा फायदा घेत करायला गेले गुटख्याची तस्करी !!
उदगीर ग्रामीण पोलिसासमोर नाहीच चालायची मस्करी !!
उदगीर (ॲड. एल पी उगिले)
उदगीर परिसर हा आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि महाराष्ट्र या राज्याच्या सीमेवर असल्यामुळे परराज्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात सहज आयात होऊ शकते. त्यातही सीमा भागाच्या जवळ असलेल्या छोट्या छोट्या गावातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन, अवैध धंदेवाले मोठ्या प्रमाणात देवणी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या तोगरी येथे साठा करून किंवा सरळ परराज्यातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ठोक व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये किंवा घरामध्ये पोहोचता करण्याचे काम काही दलाल करत असतात. याचीच सविस्तर माहिती घेत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहीम राबवत तब्बल 11 लाख 93 हजार 860 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात असून या गुटख्याची वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणारे वाहन ही जप्त करण्यात आले आहे.
या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, 30 जून च्या रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान उदगीर तालुक्यातील शिरोळ जानापुर जाणाऱ्या रोडवर दुर्गादेवी तांड्याच्या जवळ एका पांढऱ्या रंगाच्या इटियोस कंपनीची कार (एम एच 24 ए यु 35 77 ) या कारमधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांना समजताच, त्यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील राम बनसोडे, नाना उर्फ संतोष शिंदे, नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राहुल नागरगोजे, राजकुमार डबेटवार यांचे पथक बनवून त्यांना संबंधित मोहिमेवर लगेच रवाना करण्यात आले.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या पथकाने तातडीने शिरूर जानापुर गावाच्या शिवारातून वाहतूक होत असलेल्या कंपनीच्या कारचा पाठलाग करून त्या कारची तपासणी केली असता त्या कार मध्ये प्रतिबंधित केलेला केशर युक्त विमल पान मसाला ज्याचे 2496 पुडे ज्याचे अंदाजे किंमत तीन लाख 24 हजार 480 रुपये तसेच एका प्लॅस्टिकच्या छोट्या बॅगमध्ये तंबाखू किंग नाव असलेले 52 पुढे असे प्रत्येक पुण्याची किंमत 30 रुपये प्रमाणे एकूण 246 पुढे असे एकूण74,880 रुपयाचा गुटखा तसेच एका खाकी रंगाच्या कपटी बॉक्समध्ये रजनीगंधा पान मसाला असे नाव असलेले पंचवीस बॉक्स ज्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये सहा पदरी डबे प्रत्येक डब्याची किंमत 350 प्रमाणे असे एकूण 150 पत्र ज्याची एकत्रित किंमत 52 हजार पाचशे रुपये होते तसेच दुसऱ्या एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये बाबा नवरत्न असे नाव असलेले 15 बॉक्स ज्यामध्ये दहापत्री डबे प्रत्येक डब्याची किंमत 280 प्रमाणे 150 डबे असे एकूण डब्याची किंमत 42 हजार रुपये होते तसेच या सर्व प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची चोरोटी वाहतूक करण्यासाठी उपयोगात आणलेली विकास कंपनीची जुनी वापरात असलेली कार ज्याची किंमत सात लाख रुपये असे एकूण 11 लाख 93 हजार 860 रुपये किमतीचा ऐवज उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जप्त केला आहे.
सदरील प्रकरणी पो. ना. संतोष माधवराव शिंदे त्यांच्या फिर्यादीवरून त्या कार मध्ये आढळून आलेले गोपाळ बंडू केसाळे वय 28 वर्ष राहणार वांजरवाडा तालुका जळकोट यास लगेच ताब्यात घेतले दरम्यान इतर तीन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ते आरोपी विनायक महादेव गौड, नागेश अंबाजी दुरनाळे, माधव मोरे सर्व राहणार जांब तालुका मुखेड यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे 419 / 25 कलम 123, 274, 275, 223, 3 (5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर उदगीर ग्रामीणचे जेष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे हे करत आहेत.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याच्या विरोधात धाड टाकल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
