शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. तेलगाने काम करतील –बस्वराज रोडगे

0
शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. तेलगाने काम करतील --बस्वराज रोडगे

उदगीर (प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक लोक कल्याणकारी योजना अजूनही लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. काही योजना खरोखरच समाजाच्या हिताच्या असून त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तसेच शासनाने राबवलेले विविध लोककल्याणकारी उपक्रम देखील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने उदगीर तालुक्यातील विशेष काम करण्याची योजना आखली जात असून “हर घर मोदी, घर घर मोदी”भूमिका घेऊन मोदी सरकारने केलेली कामे लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न डॉ. शरदकुमार तेलगाने हे करतील. असे मत भाजपचे जेष्ठ नेते तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस बस्वराज रोडगे यांनी व्यक्त केले. ते डॉ.तेलगाने यांच्या ओम हास्पिटल या ठिकाणी डॉक्टर डे च्या निमित्ताने व डॉ. तेलगाने यांची राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कारप्रसंगी बोलत होते.
या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब जाभळे, भाजयुमो चे जिल्हा सरचिटणीस महादेव पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत बिरादार, मनोज साकोळकर ई उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. तेलगाने म्हणाले की, स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने समाजसेवेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ही भावना ठेवून “धर्मो रक्षति रक्षत:” या विचाराने प्रेरित होऊन धर्म आणि कर्म यांची सांगड घालून कार्यरत असलेले भाजप सरकार ज्या लोककल्याणकारी योजना राबवत आहे, त्या योजनांची माहिती प्रत्येकाला झाली पाहिजे. जेणेकरून विरोधकांच्या अफवा आणि अपप्रचाराला सर्वसामान्य माणूस बळी पडणार नाही. त्यादृष्टीने राष्ट्रीय मोदी सेवा समिती निश्चितच सक्रियपणे कार्य करेल. असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपण संघटन उभा करणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. शरद कुमार तेलगाने यांना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. शरद तेलगाने पूर्ण ताकतीनिशी कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!