कृषि दूतामार्फत करडखेल येथे कृषि दिन उत्साहात साजरा.

0
कृषि दूतामार्फत करडखेल येथे कृषि दिन उत्साहात साजरा.

उदगीर (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. त्यानिमित कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीरच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमाअंतर्गत मौजे करडखेल येथे वृक्षारोपण व वृक्ष दिंडी कार्यक्रम आयोजित केला होता. महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रकारची फळझाडे व शोभिवंत रोपे गावामध्ये वृक्षारोपणासाठी विद्यार्थाना उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने गावामध्ये वृक्षदिंडी, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना फळझाडे रोपे वाटप कार्यक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ. पार्वती नारायण मुसने, उपसरपंच गिरीश राघू, ग्रामसेवक पी.एन.कानुरे, कृषी सहाय्यक अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,करडखेल येथील मुख्याध्यापक दिंडेवाड, सहाय्यक शिक्षक सोनकांबळे, घुगे, गायकवाड, श्रीमती पाटील तसेच गावातील शेतकरी माणिकराव हालसे, देविदास जाधव, पांडुरंग हालसे, पंडित मुळे,शशिकांत कंजे, बजरंग कंजे, राजेंद्र गिरी, कृषी महाविद्यालयाचे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक डॉ. शिवशंकर वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद हमाने इ. उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनील तवर, सागर शिंदे, विराज शिंदे, गणेश सूर्यवंशी, वैभव सुळे,महेश शिंदे, राम शहापुरे, सुमित शोभाजी ,सुरज शिंदे या सर्व कृषी दूतांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम समन्वयक डॉ.एस. एन. वानोळे यांनी शेतकऱ्यांना शेतीतील तंत्रज्ञान आणि शेतीचे महत्व याविषयी माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील तवर तर आभार प्रदर्शन महेश शिंदे याने केले.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!