आता व्हाट्सएप वर करा अवैध धंद्यांची थेट तक्रार – पोलिस अधीक्षकांचे आवाहन

0
आता व्हाट्सएप वर करा अवैध धंद्यांची थेट तक्रार - पोलिस अधीक्षकांचे आवाहन

लातूर (प्रतिनिधी) नूतन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये लातूर पोलिसांकडून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती देण्याकरिता पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यालयाचा
व्हाट्सएप क्रमांक प्रसारीत केला आहे. नागरिकांनी सदर व्हाट्सएप वरून अवैध धंद्याची माहिती
देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. सदर व्हाट्सएप क्रमांकावर अवैध धंद्याची माहिती किंवा अवैध धंद्याविषयीची तक्रार नागरिक करू शकतात. अवैध धंद्याची माहिती अथवा तक्रार करणाऱ्याचे नाव, ओळख गोपनीय ठेवण्यात येणार आहे. व्हाट्सएप क्रमांकावर फोन न करता फक्त मेसेज, व्हिडिओ, फोटो पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याने त्याला वेसन घालण्यासाठी नवनियुक्त पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी नामी शक्कल लढवत व्हॉटसप लातुर पोलीस दलाची
अवैध धंद्यांवर कठोर कार्यवाहीसाठी विशेष मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सबळ पुराव्यासह अवैध धंद्याची माहिती अथवा तक्रार देण्याकरिता पोलीस व्हाट्सअप क्रमांक 8275000778 वर संपर्क करा..
ओळख गोपनीय ठेवण्यासाठी फक्त मेसेज, व्हिडिओ, फोटो पाठवा. लातूर पोलीस सदैव आपल्या सेवेत असणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!