कृषीदुतांमार्फत हेर व करडखेल येथे जनावरांचे लंपी आजाराचे लसीकरण संपन्न

0
कृषीदुतांमार्फत हेर व करडखेल येथे जनावरांचे लंपी आजाराचे लसीकरण संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील बी.एस.सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांमार्फत मौजे हेर व करडखेल येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता अंतर्गत जनावरांचा लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ४७ गाय व ३९ बैल अश्या एकुण ८४ जनावरांना लंपी रोगाचे लसीकरण व गायींचे कृत्रिम रेतन व गर्भ तपासणी इ. वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.
याप्रसंगी हेर गावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.गडदे यांनी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले . या उपक्रमांतर्गत गावातील पशुपालक परमेश्वर घोगरे, योगेश घोगरे, प्रेमनाथ सूर्यवंशी, उत्तम माटेकर, तानाजी सूर्यकर, रोहन बिरादार यांच्यासह अनेक पशुपालकांनी पशूंना लसीकरण करून घेतले. यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या उपक्रमाचे नियोजन व आयोजन कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थी सुनील तवर, सागर शिंदे, सिताराम शहापुरे, विराज शिंदे, महेश शिंदे, सुरज शिंदे,गणेश सूर्यवंशी, वैभव सुळे, आशिष यादव, तिडके बळीराम, संकेत उकिरडे यांनी केले.
यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी सूर्यवंशी उपप्राचार्य डॉ.ए.एम.पाटील कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन.वानोळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जी.एम. हमाने तसेच विषयतज्ञ डॉ.एस.एल.खटके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!