पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या हस्ते ‘ध्येयपथ’ या माहिती पुस्तिकेचे विमोचन
उदगीर (प्रतिनिधी) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात संस्था वर्धापन दिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची माहिती व कार्यपद्धतीविषयी माहिती सांगणारे’ध्येयपथ’ या पुस्तिकेचे प्रकाशन पोलीस उपायुक्त सोमय मुंडे व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार कार्यवाह शंकरराव लासूणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे डॉ.विनायक मुंडे, माजी विद्यार्थिनी डॉ. शीलाताई आलूरकर, डाॅ.प्रकाश येरमे, शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता यलमटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
‘ध्येयपथ’ ही माहिती पुस्तिका भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांच्या संकल्पनेतून साकारली असून या पुस्तिकेसाठी मार्गदर्शन संस्था अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर , विद्या सभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, उपाध्यक्ष उमेश जगताप , संयोजक महेश कस्तुरे यांचे लाभले आहे .तर लेखन सहाय्य डॉ. दीपक देशमुख व अनिता यलमटे यांनी केले.निर्मिती सहाय्य गजानन देशमुख ,मुद्रित शोधन बबन गायकवाड व अक्षर जुळवणी सुधर्म कुलकर्णी यांनी केले.
विमोचन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रीती शेंडे तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक कृष्णा मारावार,केरबा नेमट ,माधव मठवाले व अभ्यास पूरक मंडळ प्रमुख निलेश मांडवकर यांनी परिश्रम घेतले.
