उदगीर मध्ये समता सैनिक दल साप्ताहिक परेड नियमित चालू.
उदगीर (प्रतिनिधी)
लातूर जिल्हा (पूर्व) च्या वतीने उदगीर, अहमदपूर तालुक्यामध्ये साप्ताहिक परेड दर रविवारी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत नियमित परेड चालू आहेत. उदगीर मध्ये विश्वशांती बुद्ध विहार,अहमदपूर तालूक्यामध्ये सांगवी (सु)महाबोधी बुद्ध विहारांमध्ये तर किनगांव येथे तथागत बुद्ध विहार प्रांगणात परेड चालू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे संरक्षण करता यावे या प्रांजळ उद्देशाने निर्माण केलेल्या समता सैनिक दलाची स्थापना केली आणि समाजातील नवयुवक,माजी सैनिक, माजी पोलीस, प्रशासनातील कर्मचारी, होमगार्ड, बिगर राजकीय निर्व्यसनी महिला पुरुष यांनी यामध्ये सहभागी होऊन धम्मकार्य करावे. तसेच या सैनिकांची वेळोवेळी उजळणी परेडच्या माध्यमातून नवीन सैनिक भरती ही घेऊन समतेचा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी तयार व्हावेत. यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच समता सैनिक दलाचे स्टॉप ऑफिसर तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस के भंडारे यांच्या आदेशानुसार डी.एम. आचार्य त्यांच्या मार्गदर्शना नुसार समता सैनिक दलाचे साप्ताहिक परेड घेण्यात येत आहेत. तसेच भारतीय बौद्ध महासभा लातूर (पूर्व)चे जिल्हाध्यक्ष प्रा. सी.एम कांबळे ,सचिव माधव जाधव, कोषाध्यक्ष विजय घाटे मेजर तथा संरक्षण उपाध्यक्ष कमलाकर सांगवीक, जिल्हा संरक्षण सचिव अमोल कांबळे, डिव्हिजनल ऑफिसर, संरक्षण सचिव यशोदीप सुर्यवंशी, अहमदपूर भारतीय बौद्ध महासभा ता . अध्यक्ष प्रसाद एकनाथराव गायकवाड, ता. सचिव, ता . संरक्षण विभाग उपाध्यक्ष विजयानंद भीमराव कांबळे, ता. संरक्षण विभाग सचिव संदीप बालाजी गायकवाड, ता. संरक्षण विभाग सचिव प्रबुद्ध बंडू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर तालुकाध्यक्ष मनोहर कांबळे, सचिव विनायक सूर्यवंशी, कोषाध्यक्ष मारुती शेंदकर, महिला माजी अध्यक्षा करूणा ताई कांबळे, महिला बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षीका, कोषाध्यक्ष विद्याताई घाटे, महिला संरक्षण उपाध्यक्ष आशाताई सांगवीकर, बालीका ताई सावंत,. अंजनाताई कांबळे, कमलताई सकट, विश्रांतताई कांबळे, राधाताई कांबळे, प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण उपाध्यक्षा तथा केंद्रिय सहशिक्षक कमलाकर सांगवीकर, रावणगाव, तिवटग्याळ, एकुर्का रोड, शिरूर ताजबंद,नागलगाव या ठिकाणी हे रविवारपासून परेड होणार आहेत.
