जे पी फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा.
जीवन प्रयाग फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांना पुष्प देऊन डॉक्टर्स दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.
डॉक्टर्स डे हा दिवस सार्वजनिक आरोग्यामध्ये डॉक्टरांच्या भूमिकेवर भर देतो, विशेषतः साथीच्या आजारांसारख्या संकटांच्या काळात, जिथे त्यांची तज्ज्ञता आणि नेतृत्व महत्त्वाचे असते. आरोग्यसेवा ही एक सामुदायिक प्रयत्न आहे आणि सार्वजनिक आरोग्य राखण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते, याची आठवण करून देते.
या दिवशी आपल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन पुष्प देऊन डॉक्टर्स डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी, नितीश शिरसे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
