डॉ. दाभोळकरांच्या विचारावर वाटचाल केल्यास, आरोग्य व मानसिक दृष्ट्या समाज सुदृढ होईल – डॉ. माधवराव चंबुले
उदगीर (एल पी उगीले) समाजातून अंधश्रद्धा पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने जर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची विचारधारा समजून घेऊन मानसिक दृष्ट्या सशक्त बनून काम केल्यास आरोग्यही ठीक राहील आणि मानसिक स्थिती ह ठीक राहील असे विचार डॉ. माधव चंबूले यानी व्यक्त केले.
उदयगीरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे निमित्त, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर तर्फे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. अनिस उदगीर शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी डॉ. माधव चेंबुले यांचा, उपाध्यक्ष माशाळकर यांनी डॉ. स्वामीचा तर प्राध्यापक डॉ. बळीराम भूक्तरे यांनी डॉ. वडगावकरांचा शाल व पुष्पहारासह डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. माधव चेंबुले म्हणाले की, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी, जादूटोणाविरोधी कायदा पास करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे बलिदान झाले. अंधश्रद्धेमुळे समाजाची प्रगती होत नाही, डॉ. दाभोळकरांनी वैद्यकीय क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करून, समाजाचे स्वास्थ्य सुधारावे म्हणून प्रबोधन केले. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभी केली.
त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल केल्यास, समाजाचे शारीरिक व मानसिक आरोग्य व मानसिक दृष्ट्या समाज सुदृढ होईल. डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आपण सर्वांनी विवेकी समाज निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका सचिव शिरीष रोडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
