पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातमीचा दणका !! वाळू माफीयांना बावकरांचा हिसका !!

0
पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातमीचा दणका !! वाळू माफीयांना बावकरांचा हिसका !!

25 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!!
वाळू माफिया वर पाळतही ठेवणार आता गुप्त !!

लातूर (ॲड. एल.पी.उगीले) लातूर जिल्ह्यात वाळू माफीयांचा सर्रास चालू असलेला बाजार साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूजने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर एका पाटोपाट एक अशा धाडी पडायला सुरुवात झाली. आयपीएस अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांच्या धडाकेबाज मोहिमेनंतर आता पुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही वाळू माफियाकडे वक्रदृष्टी करून वाळू माफीयांच्या हालचाली टिपायला सुरुवात केली आहे. अहमदपूर पोलिसांच्या गलथान कारभाराचे धिंडवडे काढत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी, जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहिती वरुन दिनांक 3/07/2025 रोजी रात्री अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोडवर सापळा लावून गौण खनिज वाळूची अवैध चोरटी वाहतूक करीत असलेल्या वाळूने भरलेल्या हायवा टिप्पर किंमत 25 लाख रुपये, त्यामध्ये विना पास परवाना चार ब्रास वाळू 20 हजार रुपये असा एकूण 25 लाख 20 हजार रुपयाच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यासंदर्भात पोलीस ठाणे अहमदपूर येथे विनापरवाना वाळूची चोरटी अवैध वाहतूक केल्याप्रकरणी नमूद आरोपी
पिराजी समृत हाके, (वय 32 वर्ष,राहणार हुलेवाडी पोस्ट सावरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड), विकास काशिनाथ क्षिरसागर, (राहणार आडगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड).
यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे पिराजी हाके यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे अहमदपूर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, सचिन धारेकर, मनोज खोसे, चंद्रकांत डांगे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!