शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा मुख्याधिकाऱ्यांना महाराष्ट्र जनएकता संघटनेचे निवेदन

0
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा मुख्याधिकाऱ्यांना महाराष्ट्र जनएकता संघटनेचे निवेदन

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जनएकता संघटना उदगीरच्या वतीने नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की, उदगीर शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे असून शहरात मोकाट कुत्रे पायी व वाहनावर येणारे जानारे नागरिकांना चावा घेत आहेत. तसेच शहरातील ठिकठिकाणी वयोवृद्ध नागरिकांना व विद्यार्थ्यांना मागून येऊन मोकाट कुत्रे चावत आहेत. त्या करीता मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, उदगीर शहरातील मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून उदगीरकरांना न्याय देण्यात यावे,अन्यथा आम्ही महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने लातूर जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आंदोलन करू. असा इशारा देण्यात आलेला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र जनएकता संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष सिकंदर भैय्या शेख,प्रा राजेश चव्हाण, उत्तम बिरादार, शहर उपाध्यक्ष वजिर सय्यद ,शहर उपाध्यक्ष इस्माईल मनियार, शहर उपाध्यक्ष अभिजीत तोरे, सल्लागार चृकांत कस्तुरे इ.कार्यांकर्त उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!