शहरातील शाळा, महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर टुकार मुलांना थांबण्यास प्रतिबंध करा – मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

0
शहरातील शाळा, महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर टुकार मुलांना थांबण्यास प्रतिबंध करा - मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

उदगीर (एल पी उगीले)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतिने उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन शहरातील प्रमुख शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थांबणाऱ्या टुकार पोरांना प्रतिबंध करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
उदगीर शहरातील प्रमुख शाळा ज्यामध्ये प्राधान्याने श्यामलाल विद्यालय,लाल बहादूर शास्त्री विद्यालय, विद्यावर्धिनी विद्यालय, छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, हावगीस्वामी महाविद्यालय, उदयगिरी महाविद्यालय आशा मोठ्या शाळा, महाविद्यालय समोर काही टुकार मुले मोटारसायकल घेऊन मुलींची छेड काढत असल्याची तक्रार पालकांकडून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना येत आहे.उदगीर शहरात लव्ह जिहाद सारख्या घटना वाढिस लागत आहेत.आपण शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळी महिला पोलीस अधिकारी यांना निरिक्षण करण्यासाठी थांबवावे, व दामिनी पथक स्थापन करण्यात यावे.मुलींची छेड काढणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना शाळा, महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर थांबण्यास प्रतिबंध करावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना मनसे दणका देण्यात येईल. असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. संबंधितांना निवेदन देताना मनसे शहराध्यक्ष संतोष भोपळे, मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड, मनसे विभागाध्यक्ष, विनोद चव्हाण, शाखा सचिव पंकज गायवाडे, मनविसे दिपक करक्याळे,अनिकेत कोळी, ओमकार बिरादार, संदेश दापके,करण बुर्ले,शिवम हिबाने,प्रसाद स्वामी, शेल्हाळे राहुल, रितेश राठोड,धोंडीराम पवार,जितु चव्हाण, अतिश पवार यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!