आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदे मित्र मंडळाकडून भव्य सत्कार
उदगीर (एल पी उगीले)
महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा, युवक कल्याण व बंदरे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदार संघाचे आ. संजय भाऊ बनसोडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शुभेच्या, सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते, नेते मित्र मंडळाच्या वतीने भव्य क्रेन व असंख्य जे.सी.बी च्या सहाय्याने फटाक्याच्या गजरात पुष्पवृष्टी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
या वेळी सत्कार सोहळ्याचे संयोजक बाळासाहेब पाटोदे, उदय मुंडकर, सतीश पाटील मानकीकार, प्रा.मदन पाटील, गणेश गायकवाड,कुणाल बागबबंदे,अजीत फुलारी,अंकुश ताटपले,युवराज कांडगिरे, बळवंत चिंचोलकर, संतोष पांढरे,बाबासाहेब कांबळे,पंकज कालानी,प्रमोद कालोजी,गोपाळ पाटील, कमलाकर फुले,श्याम मोरे,बालाजी हुरुसनाळे ,ऋषी पाटील,दीपक मोरे,परमेश्वर बिरादार,दिनू बिरादार ,अमोल पाटील, शिवशंकर पाटील,गिरीश पाटील, गिरीश सूर्यवंशी, गोपाळ वाडकर ,प्रतीक पाटील,यशवंत बिरादार, रामदास माळेगावे,बालाजी नादरगे, राहुल अतनुरे, डी.एस.बिरादार,अनिल बिरादार,संतोष राठोड ,गणेश जाधव, दिनेश पाटील,पिंगळे ओमकार यांच्यासह हजारोंच्या संख्येने युवक उपस्थित होते.
