नेहरू मेमोरियल हायस्कूल तोंडार या शाळेत विद्यार्थी संसद मंत्रिमंडळाचे उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे तोंडात येथील नेहरु मेमोरियल हायस्कूल या शाळेत विध्यार्थी संसदेच्या मंत्रिमंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गरीब विध्यार्थ्यांना 1 डझन वही व पेन पाकीट देण्यात आले. शासकीय रेखाकला परीक्षेतील यशस्वी विध्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे आध्यक्ष माजी आमदार प्रा. मनोहरराव पटवारी कार्यक्रमाचे आध्यक्ष म्हणून तर उद्घाटक म्हणून देविदास होनराव उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन बिरादार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. नंतर विध्यार्थी संसदेमध्ये निवडून आलेल्या मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. विध्यार्थ्यांना पेन, वह्या तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सहशिक्षक बिरादार एम. बी. यांनी सूत्रसंचालन केले.आध्यक्ष पटवारी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक शेटकार पी. के. यांनी आभार मानले. या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
