माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान
उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कामगार चौकात महाराष्ट्र संघर्ष अभियानच्यावतीने अन्नदान करण्यात आले.
कामगार बांधवांसाठी आयोजित अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र संघर्ष अभियान चे अध्यक्ष बाबासाहेब सुर्यवंशी यांनी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, शहराध्यक्ष सय्यद जाॅनीमिया, माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, मधुमती तनशेट्टे, माजी उपाध्यक्ष फैजूखाॅ पठाण, शेख फय्याज, प्रा. शाम डावळे, इम्तियाज शेख, शिवकुमार कांबळे, शशीकांत बनसोडे, वसंत पाटील, प्रदिप जोंधळे, संघशक्ती बलांडे, मनोहर गायकवाड, मारोती तलवाडकर, दशरथ वाघमारे, शफी हाशमी, बापू सोळंके आदींसह कामगारवर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
