तरुणाचा चाकूने भोसकून खुन, शहरात तणावाचे वातावरण 

तरुणाचा चाकूने भोसकून खुन, शहरात तणावाचे वातावरण 

उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळ असलेल्या बसवेश्वर चौकात एका तरुणास चाकूने भोसकून खून झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी हाती आलेली माहिती अशी की, जगदीश विजय कीवंडे हा सिगारेट ओढत थांबला असता, त्याच्या शेजारीच सोन्या नाटकरी  हा येऊन थांबला. विजय सिगारेट ओढत असताना त्या सिगारेटचा धूर सोन्या नाटकरे याच्या तोंडाकडे जात होता. त्यामुळे नाटकरे यांनी जगदीश यास सिगारेटचा धूर बाजूला सोड, म्हणत असताना दोघांमध्ये तू तू – मै मै झाले. यातून तू माझ्याकडे रागाने का पाहतोस? असे विचारल्यावर त्याला राग आला, त्यातून त्या दोघात मारामाऱ्या झाल्या. दरम्यान सोन्या नाटकरे याने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून त्याच्या पोटात खुपसला. त्यामुळे जगदिश विजय किवंडे हा गंभीर जखमी झाला, त्यास उपचारासाठी लातूर कडे घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

 या प्रकरणी मयताची नातेवाईक सुनिता विजय किवंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 219/ 21 कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला होता पुढे जगदिश मरण पावल्यामुळे यामध्ये कलमात वाढ होऊन कलम 302 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऐडके यांच्याकडे देण्यात आला आहे. मयत जगदीश  यांच्या मृत्युमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले.  शहरात शांतता राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे आणि त्यांच्या पथकाने चौख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती चिघळली नाही. चौका चौकात पोलिसांनी गस्त चालू ठेवल्यामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!