श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी येथे भाविकांची अलोट गर्दी,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

0
श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी येथे भाविकांची अलोट गर्दी,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा

डोंगरशेळकी (प्रतिनीधी) :- मराठवाड्यातील प्रतिपंढरपूर तिर्थश्रेत्र (ब)दर्जा प्राप्त येथील श्री समर्थ धोंडुतात्या महाराज संस्थानात आषाढी एकादशीनिमित्त लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली.
शेजारील राज्य कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश यांच्यासह पंचक्रोशीतील गावांमधून आलेल्या पायी दिंड्यांनी परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणाने भारून गेला.नागमोडी वळणांनी मार्गक्रमण करत, मुखी ‘हरी नाम’ घेत भावीक भक्त पावले खेळत होती.यावेळी उदगीर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,सौ.स्वाती सुशांत शिंदे उपजिल्हाधीकारी धर्माबाद यांच्या शुभहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. तर माजीमंत्री आ.संजयभाऊ बनसोड, यांनीही मंदीर देवस्थानला भेट देऊन सर्व पहानी केले.त्यांच्या समवेत मंदीर विश्वस्त बाबुराव घटकार,व्यंकटराव मुंडे,रामदास बेंबडे,गणेश गायकवाड, हाणमंत शेळके,मारोती मुंडे,चंद्रपाल शेळके, हणमंतराव हंडरगुळे,ज्ञानोबा गुरमे,हाणमंत मुंडे,व्यंकटराव मरलापल्ले,मंदिर परिसर फुलांनी सजवलेला होता, आणि भाविकांसाठी फराळ, निवास व आरोग्य तपासणी आदी सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली होती.माऊली ब्लड बॅक लातूर यांच्या वतिने रक्तदान कॅम्प लावण्यात आला होता.भाविकांच्या गर्दीची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून वाढवणा पोलीस ठाण्याच्या वतीने चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तसेच,उदगीर आगाराच्या वतीने ज्यादा बसेसची सुविधा देण्यात आली होती,ज्यामुळे भाविकांचा प्रवास सुलभ व सुखकर झाला.मंदीर परिसरात दुनाने मोठ्या प्रमाणात लागली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!