लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात एनसीसी कॅडेट तर्फे वृक्षारोपण

0
लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात एनसीसी कॅडेट तर्फे वृक्षारोपण

उदगीर :(प्रतिनिधी) येथील लाल बहादूर शास्ञी माध्यमिक विद्यालयात
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एनसीसी कॅडेट तर्फे भारतीय वंशाच्या वृक्षांची लागवड विद्यालयाच्या परिसरात करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासूणे, माजी मुख्याध्यापक नेलवाडकर , विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक ज्ञानेश मातेकर, पर्यवेक्षक कृष्णा मारावार, किरण नेमट, माधव मठवाले व अभ्यास पूरक मंडळ प्रमुख अनिता येलमटे, निलेश मांडवकर, विज्ञान विषय शिक्षक राहुल नेटके, संदीप बोधनकर, क्रीडा शिक्षक संतोष कोले, एनसीसी विभागप्रमुख विष्णू तेलंग व महाराष्ट्र फिफ्टी थ्री बटालियन एनसीसी ऑफिस लातूर येथील हवालदार शिवशंकर निकम, रवी कुमार व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!