एज्युव्हीजन व न्यू इरा किड्स इंग्रजी शाळेत आषाढी महोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा
अर्धापूर (उध्दव सरोदे )
शहरातील नामांकित एज्युव्हीजन व न्यू इरा किड्स इंग्रजी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध देखाव्यांसह तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विविध फलकांद्वारे पाणी वाचवा, महिला सबलीकरण,स्वच्छ शहर सुंदर शहर याबाबतचे संदेश शैक्षणिक वारीतून देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक वारीला शाळेपासून सुरुवात होऊन ती बसवेश्वर चौक,अहिल्यादेवी चौक, हनुमान मंदिर,बालाजी मंदिर या मार्गे जाऊन सावित्रीबाई फुले नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ कार्यक्रमाची सांगता झाली.शहरातून दिंडी जात असताना भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष अँड. किशोर भाऊ देशमुख यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना फळ वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आवरदे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती अर्धापूरचे गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत कऱ्हाळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले.
एज्युव्हीजन व न्यू इरा किड्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले देखावे पाहून पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त अर्धापूर शहराला प्रति पंढरपूरचे रूप आले होते.
याप्रसंगी कै.शंकरअप्पा रावते बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.रेखाताई रावते तर सचिव प्रवीण रावते,एज्युव्हीजन प्रायमरी इंग्रजी शाळेच्या प्राचार्या प्रिया रावते आणि न्यू इरा किड्स शाळेचे प्राचार्य प्रतीक चवडकर आणि शिक्षक वृंद आशुतोष पुरी,मिलन जैन, मल्हारी लिंगायत,अंजली जडे,स्वाती पांचाळ, अलका धुमाळ,कोमल डांगे, शिवराणी पत्रे,ममता हट्टेकर,स्वाती माने,रोहिणी शिंदे,प्रियांका आव्हाड, कविता गोरे, रासवंते दीदी,विजय पवार तसेच पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक चवडकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रवीण रावते यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रिया रावते आणि शाळेचे संचालक प्रवीण रावते यांनी सर्वांचे आभार मानले.
