पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातमीचा आणखी एक दणका !!गुन्हे शाखेचा चा उदगीरातही वाळू माफियांना हीच का !!
उदगीर (एल पी उगीले)
लातूर जिल्ह्यात वाळू माफीयांनी हैदोस घातला आहे. या अनुषंगाने साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूजने सतत लिखाण केले आहे. अहमदपूर पोलिसांचा कानाडोळा होत असल्यामुळे, वाळू माफिया गंगाखेड परिसरातून वाळूचा अवैध उपसा करून, शासनाचा महसूल कर बुडवून, चोरटी वाहतूक करून, वाळू साठवणूक करणे किंवा वाहतूक करून विक्री करणे, यात पटाईत झाले आहेत. त्यातही प्राधान्याने दलालांचे फार मोठे वर्चस्व निर्माण झाले आहे. या दलालांच्या वर्चस्वाच्या संदर्भात साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज ने वेळोवेळी लिखाण केल्यामुळे चाकूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने मोठी धाड टाकली होती. त्यानंतर पुन्हा पोलीस फ्लॅश न्यूजने या होत असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीतून चालू असलेल्या अवैध धंद्याच्या अनुषंगाने लिखाण केल्यानंतर नव्यानेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला रुजू झालेले, गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी स्वतः पुढाकार घेत अहमदपूर हद्दीमध्ये वाळू माफिया वर धाड टाकून हायवा जप्त करून, चार ब्रास वाळू ही जप्त केली होती. नूतन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अवैध धंदे विरोधी मोहिमेमुळे दस्तूर खुद्द पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे अवैध धंद्यावर लक्ष ठेवून आहेत. उदगीर परिसरात ही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून त्यात वाळू माफियांचा मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपसा आणि महसूल बुडवणे असे प्रकार चालू असल्याच्या अनुषंगाने केलेल्या लिखाणावरून पुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार जुलै च्या रात्री या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले, पो.ना. योगेश गायकवाड, पो. का. तुळशीराम बरुरे यांच्या पथकाला उदगीर परिसरातील वाळू माफिया च्या संदर्भात माहिती काढून मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करत, आपल्या गोपनीय माहितीदार सूत्राकडून त्यांनी माहिती मिळवली.
ते खाजगी वाहनाने उदगीर शहरातील उमा चौक परिसरात आले असता त्यांना उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे चापोह लोखंडे हे भेटले. त्यांना सोबत घेऊन अवैध वाळू वाहतुकीची माहिती काढत असतानाच गुप्त बातमीदारांनी त्यांना माहिती दिली की, अहमदपूर येथून उदगीरकडे हायवा टिप्पर (क्रमांक एम एच 01 सी व्ही 66 61) ही रेती वाळू घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून सदरील वाळू आणि हायवा जप्त करण्यासाठी दोन पंचांना बोलावून घेऊन त्यांना सदरील माहितीच्या संदर्भात सांगितले. त्यांनी पंच म्हणून काम करण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांना सोबत घेऊन या पथकाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या समोर येऊन वरील गाडीची प्रतीक्षा करत थांबले असता, नमूद क्रमांकाचे वर्णनाचे हायवा टिप्पर अहमदपूर कडून उदगीरच्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. त्यास उदयगिरी कॉलेज जवळ रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाताने इशारा करून थांबवले असता, सदरील हायवा टिप्पर गाडी मध्ये एक इसम आढळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव अण्णासाहेब प्रभाकर कांबळे ,(वय 32 वर्षे राहणार लेंडी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) असे सांगितले. सदर हायवा टिप्पर मध्ये काय आहे? असे विचारले असता त्यांनी रेती (वाळू) असल्याचे सांगितले. सदर रेती (वाळू) व हायवा टिप्पर हे कोणाचे आहे? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, माझे मालक किशन दगडू कदम (राहणार चिलका तालुका अहमदपूर) यांचे आहे. व मी ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्या सदर हायवा टिप्पर चा क्रमांक काय आहे? असे विचारले असता सदर हायवा टिप्पर चा क्रमांक एम एच 01 सीव्ही 66 61 असल्याचे सांगितले. सदर रेती (वाळू) वाहतुकीचा परवाना आणि शासनास भरलेल्या महसूल कराची पावती बद्दल विचारपूस केली असता, त्याने त्यास कोणताही परवाना आणि कर पावती नसल्याचे कळविले. त्यावरून पंचा समक्ष सदरील हायवा आणि रेती जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पथकाने 25 लाख रुपयाचा हायवा आणि त्यात असलेली चार ब्रास वाळू याची किंमत वीस हजार रुपये होते, असे एकूण 25 लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील व्यक्तीविरुद्ध कलम 303 (2),3(5) भारतीय न्याय संहिता व सहकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु. र.न. 431 /25 प्रमाणे आरोपी अण्णासाहेब प्रभाकर कांबळे आणि किशन दगडू कदम दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पो. ना. योगेश गायकवाड, पो. का. तुळशीराम बरुरे यांच्या पथकाने यशस्वी केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तुडमे हे करत आहेत.
