शिवसेना उबाठा तर्फे भजनी मंडळीला फराळाचे वाटप
उदगीर (प्रतिनिधी)
येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख बालाजी सोनाळे यांनी श्री समाधान हनुमान मंदिर येथे वारकऱ्यांना व महिला भजनी मंडळी यांना फराळाचे वाटप केले. याप्रसंगी भजनी मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी कदम, आशा पाटील, भूसनवाडताई, पाटील ताई यांच्यासह भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख बालाजी सोनाळे, उपशहर प्रमुख रामराव मोरे, विभागप्रमुख नागनाथ वाघमोडे, शाखाप्रमुख शिवशेट्टी, ग्रामीण उपशहर प्रमुख अरुण बिरादार आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
