रिपाइं {आ} उदगीरच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा
उदगीर (प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी उदगीर च्या वतीने आ. संजय बनसोडे यांचा वाढदिवस विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी उदगीर च्या वतीने आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा व गुणवंत विद्यार्थी सत्कार घेण्यात आला. तसेच आ. संजय बनसोडे यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उदगीर च्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय निटुरे, ॲड. प्रफुलकुमार उदगीरकर, जानीमिया शेख, बाळासाहेब पाटोदे, संगम टाले, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक सिद्धेश्वर पटणे होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, अतुल घोडके, अमोल शृंगारे, नितीन गायकवाड, कपिल शिंदे, अतुल कांबळे, नरेश चांदे, परमेश्वर बन, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश कांबळे, सागर सोनकांबळे, राजकुमार माणसे इत्यादीने केले होते.
