उदगीर मसाप शाखेच्या अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर तर सचिव रामदास केदार

0
उदगीर मसाप शाखेच्या अध्यक्षपदी धनंजय गुडसूरकर तर सचिव रामदास केदार

उदगीर (प्रतिनिधी) : येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांची तर सचिवपदी प्रा. रामदास केदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेच्या सभागृहात झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीत धनंजय गुडसूरकर यांची अध्यक्षपदी तर रामदास केदार यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, उपाध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश शिंदे, प्रा. ज्ञानेश्‍वर हंडरगुळीकर, सहसचिव अनिता यलमटे, एकनाथ राऊत, कार्यकारणी सदस्य म्हणून विवेक होळसंबरे, बाबुराव माशाळकर, सूर्यकांत शिरसे, रसूल पठाण, प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव, डॉ. धनाजी कुमठेकर, प्रा. डॉ. व्हि. डी. गायकवाड, विनोद मठपती, प्रवीण जाहुरे, राजकुमार मोगले, प्रा.राजपाल पाटील, सुरेखा गुजलवार, अलका केदार, विक्रम हलकीकर यांची निवड करण्यात आली. उदगीर शाखेचे सल्लागार म्हणून मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भरत चामले, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, ॲड. पद्माकर उगिले, विश्वनाथ बिरादार, प्रा. डॉ. बाळासाहेब दहिफळे, प्रा. डॉ. राम साबदे, ज्योतिबा कांदे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मसपच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस् प्रा. डॉ. जयदत्त जाधव यांनी काम पाहिले. ही शाखा बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. यावेळी ॲड.संजय हुले, मोतीलाल डोईजोडे, अंबादास केदार, प्रा. व्यंकट सूर्यवंशी, लक्ष्मण बेंबडे, सुनंदा सरदार, शिवाजी बिरादार, प्रमोद पदातूरे यांच्यासह साहित्य प्रेमी उपस्थित होते .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!