दि.लि .होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

0
दि.लि .होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) येथील दि.लि .होळीकर प्रतिष्ठान तर्फे उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयातील अशोक मेहता सभागृहात दहावी एकवीस, बारावीचे बारा व दोन एमपीएससी आकाश पांडे, रितेश मत्तकटे, एक युपीएससी कृष्णा पाटील कोदळीकर अशा विविध स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्ररुग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया, प्रतिष्ठानचे सदस्य प्रकाश साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुशांत शिंदे म्हणाले विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाप्रमाणे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पूर्ण करावेत. कॉपी सेंटर असलेल्या नॉमिनल कॉलेजमध्ये प्रवेश न घेता खऱ्या अर्थाने गुणवत्ता वृद्धिंगत करणाऱ्या उदगीर शहरातील कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावे.शिक्षण घेतल्यानंतर गाव व समाजांना विसरू नये. अध्यक्ष समारोपात डॉ. लखोटिया म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून आवडीचा विषय घेतल्यास प्रगती होते. परिश्रमाने पुढे जाता येते. प्रस्ताविकात प्रा. डॉ.दत्ताहरी होनराव यांनी आजचे शिक्षण वास्तव व होळीकर गुरुजीचा संपूर्ण उदगीरची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणाऱ्या शैक्षणिक फोरमचा तुलनात्मक आढावा घेऊन पालकांनी विद्यार्थ्यांना उदगीर शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश द्यावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन यशवंत बिरादार व प्रा. डॉ. माधव कांबळे यांनी केले. आभार तुळशीदास बिरादार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!