पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षीच्या प्रवेशास सुरुवात

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षीच्या प्रवेशास सुरुवात

अहमदपूर (गोविंद काळे) : शैक्षणिक वर्ष 2021 – 22 साठी दहावीनंतर प्रथम वर्ष व बारावी सायन्स, आयटीआय, MCVC नंतर थेट द्वितीय वर्षात पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 30 जून पासून बालाघाट पॉलिटेक्निक रुद्धा ता.अहमदपूर येथे सुरू करण्यात आली आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ,कॉम्पुटर या शाखांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू आहे. या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. असे आहवान संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केले आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सिईटी) नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या गुणांनुसार प्रथम वर्षात प्रवेश मिळणार आहे. व बारावी सायन्स, आयटीआय, MCVC उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेता येतो. प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी बालाघाट पॉलिटेक्निक अहमदपूर येथे विनामूल्य सुविधा केंद्र (FC-2190) स्थापन करण्यात आले आहे.

आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रम मराठीतून

चालू वर्षापासून (२०२१-२२) पासून अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्याकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेचे अंमलबजावणी ऐच्छिक स्वरुपात मराठी माध्यमातून राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी पदविका आपणास मातृभाषेमधून शिकता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ई-स्क्रुटीनी व प्रत्यक्ष स्क्रुटीनी म्हणजे संस्थेत जाऊन असे पर्याय उपलब्ध आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ई- स्क्रुटीनी या पर्यायाची निवड करता येईल ई- स्क्रुटीनी मध्ये विद्यार्थी स्वतःच्या संगणकाद्वारे किंवा मोबाईल द्वारे प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर न जाता घरूनच अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करू शकतात. प्रत्यक्ष स्क्रुटीनी साठी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रासह सुविधा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्याकडे लॅपटॉप किंवा इंटरनेट ची व्यवस्था नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी बालाघाट पॉलिटेक्निक (FC-2190) मध्ये जाऊन विनामूल्य अर्ज करून घ्यावा. असे संस्थेचे अध्यक्ष गणेश हाके म्हणाले.

About The Author